Hindi Diwas 2023: कुमार विश्‍वास यांचा कार्यक्रम रद्द! हिंदी कविसंमलेनाला मराठी प्रेक्षकांना नाकारला प्रवेश

आयोजकांच्या ताठर भूमिकेमुळे मराठी - हिंदी वादाचे स्वरुप
Kalidas Kala Mandir
Kalidas Kala Mandiresakal

Hindi Diwas 2023 : प्रवेशिका नसल्यामुळे हिंदी कविसंमलेनाला प्रवेश नाकारलेल्या मराठी भाषिक श्रोत्यांनी कुमार विश्वास यांचा हिंदी दिनानिमित्त आयोजित कविसंमेलन गुरुवारी (ता. १४) सायंकाळी हाणून पाडले. आयोजकांच्या ताठर भूमिकेमुळे कार्यक्रमाला मराठी - हिंदी वादाचे स्वरुप प्राप्त झाले.

आमदार सीमा हिरे, दिनकर पाटील, अंकुश पवार यांनी मध्यस्थी करूनही तोडगा निघाला नाही. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आयोजकांना कार्यक्रम रद्द करावा लागला. (Hindi Divas 2023 Kumar Vishwas show cancelled Marathi audience denied entry to Hindi Kavisamlena nashik)

esakal

हिंदी दिनानिमित्त हिंदी प्रसारिणी सभेच्या वतीने कालिदास कलामंदिर येथे कुमार विश्वास यांचा सहभाग असलेला हिंदी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रवेशिका होत्या, मात्र प्रसिद्धी देताना ‘केवळ प्रवेशिका असलेल्यांसाठी’ असा उल्लेख नसल्यामुळे ज्यांच्याकडे प्रवेशिका नाही, असेही रसिक कालिदास कलामंदिर प्रवेशद्वारासमोर गोळा झाले.

मात्र ज्यांच्याकडे प्रवेशिका नव्हती, अशा प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे चिडलेल्या मराठी भाषिक (ज्यांच्याकडे प्रवेशिका नव्हती) प्रेक्षकांनी गोंधळ घालत आम्हालाही कुमार विश्वास यांचा कार्यक्रम ऐकायचा आहे, अशी भूमिका घेतली.

आयोजक व आंदोलनकर्ते प्रेक्षक यांच्यातील वादाला मराठी व हिंदी भाषेचे स्वरुप आले. या वेळी दीडशेच्या आसपास मराठी भाषिक प्रेक्षक जमा झाले होते. यामुळे तणावाचे वातावरण झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kalidas Kala Mandir
Hindi Diwas: 'सनातन'नंतर आता 'हिंदी'बाबत उदयनिधी स्टॅलिन यांचं विधान चर्चेत; अमित शहांच्या भाषणावर दिली प्रतिक्रिया

या गोंधळानंतर आमदार सीमा हिरे, दिनकर पाटील आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी मध्यस्थी करून मराठी माणसांचा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

वाढलेला गोंधळ पाहता अखेर आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आलेल्या सर्व प्रेक्षकांना माघारी फिरावे लागले. मराठी माणसांना गृहित धरण्याचे काम हिंदी भाषिकांनी करू नये.

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अंकुश पवार यांनी दिला. आमदार सीमा हिरे म्हणाल्या, माझ्या मतदारसंघात हिंदी भाषिक असल्यामुळे मी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या होत्या.

माझा या कार्यक्रमाच्या आयोजनात कोणताही सहभाग नाही. मराठी भाषिकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. पोलिसांनीही अखेर कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केल्याने आलेले मराठी भाषिक व अन्य श्रोते माघारी फिरले.

Kalidas Kala Mandir
Hindi Diwas 2023 : परदेशी कंपन्याही हिंदीचे वर्चस्व स्वीकारतात, ही आहेत 5 उदाहरणं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com