हिरालाल चौधरी यांना अभिवादन

हिरालाल चौधरी यांना अभिवादन
Published on: 
NSK26H35083 नंदुरबार : येथील हिरालाल चौधरी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हिरा प्रतिष्ठानतर्फे आयोजित अभिवादन सोहळ्यास उपस्थित मान्यवर. --- हिरालाल चौधरी यांना हिरा प्रतिष्ठानतर्फे अभिवादन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : स्वर्गीय हिरालाल चौधरी यांनी सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक विकास, समाजहित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रति नेहमीच संवेदनशीलता जपली. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन कार्य करण्याची त्यांची भूमिका होती. सर्वांशी आपुलकीने वागण्याच्या शैलीमुळे त्यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते, अशी भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली. हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हिरा प्रतिष्ठानतर्फे शालेय पटांगणात आयोजित अभिवादन सोहळ्यात आठवणींना उजाळा देण्यात आला. नंदुरबार शहर तेली समाजाचे पदाधिकारी, हिरा प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी, शहरातील सामाजिक, राजकीय व व्यापार क्षेत्रातील मान्यवर, तसेच चौधरी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. हिरालाल चौधरी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे. हिरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य उभे केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष यातून मिळते. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, गरजूंच्या अडचणी समजून घेणे आणि समाजाच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेणे, ही त्यांची कार्यपद्धती होती. राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी समाजहिताला प्राधान्य दिले होते, असा सूर या वेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.