एड्सवर मार्गदर्शन कार्यक्रम

एड्सवर मार्गदर्शन कार्यक्रम
Published on: 
धुळे टुडे २ साठी अँकर... --- फोटो-NSK26H31805 धुळे ः विद्यावर्धिनी महाविद्यालयात एचआयव्ही-समस्या, नियंत्रण व उपाय या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. जगदीश पाटील. शेजारी मान्यवर. --- ‘एचआयव्ही’बाधित व्यक्तींप्रति मानवी दृष्टिकोन गरजेचा प्राचार्य डॉ. जगदीश पाटील; विद्यावर्धिनीत मार्गदर्शन कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ ः एचआयव्हीसारख्या संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांना शास्त्रीय माहिती मिळणे आणि त्यातून समाजातील गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. जनजागृतीसोबतच बाधित व्यक्तींप्रति सहानुभूती, सन्मान आणि मानवी दृष्टिकोन ठेवणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. विद्यावर्धिनी महाविद्यालयात रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘एचआयव्ही-समस्या, नियंत्रण व उपाय’ या विषयावर कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. जगदीश पाटील अध्यक्षस्थानी होते. आधार बहुउद्देशीय संस्थेतील समुपदेशक दुर्गेश पाचोंदे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीटीसी समुपदेशक बाबाजी पाटील प्रमुख मार्गदर्शक होते. श्री. पाचोंदे यांनी एचआयव्ही संदर्भातील अनेक सामाजिक गैरसमजावर प्रकाश टाकला. एचआयव्ही बाधित व्यक्तीला केवळ आजाराच्या आधारावर दूर लोटणे किंवा त्याच्याशी भेदभाव करणे योग्य नाही. योग्य वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि कुटुंबीयांचा व समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे या रुग्णांसोबतही व्यक्ती सन्मानाने जीवन जगू शकते, असे त्यांनी सांगितले. एचआयव्ही प्रतिबंध, तपासणी व उपचाराची आवश्यकता या विषयावर समुपदेशक पाटील यांनी एचआयव्ही संसर्गाची संभाव्य कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, तपासणीचे महत्त्व आणि उपलब्ध उपचारपद्धती याबाबत माहिती दिली. लवकर तपासणी झाल्यास योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार घेणे शक्य होते. त्यामुळे भिती किंवा लाज न बाळगता आवश्यकतेनुसार तपासणी व समुपदेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. नीलेश रोटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. देवीदास चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. मंजू तरडेजा, डॉ. ममता भारुडे, प्रा. श्वेता पाटकरी, डॉ. विशाल गवळी, प्रा. अविनाश मराठे यांच्यासह रेड रिबन क्लबचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. एचआयव्ही संदर्भातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे, शंकांचेही या वेळी निरसन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com