होळ ते सोनगीर मार्गाचे रुंदीकरण मंजूर

होळ ते सोनगीर मार्गाचे रुंदीकरण मंजूर
Published on: 
SGR26B07621 सोनगीर : रुंदीकरण होणाऱ्या रस्त्याचा नकाशा. ------- होळ ते सोनगीर मार्गाचे रुंदीकरण अखेर मंजूर सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. २९ : नरडाणा व बाभळे औद्योगिक वसाहतीतील वाहतुकीची समस्या सुटावी म्हणून होळ (ता. शिंदखेडा) ते वाघोदे, वालखेडामार्गे सोनगीरपर्यंत रस्त्याचे नवीन बांधकाम व रुंदीकरणाचे काम मंजूर झाले असून, रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस साडेसात मीटर रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे तेवढ्या भागातील विविध पोल, जमिनीअंतर्गत जलवाहिनी काढून अन्य मार्गाने टाकावी, असे निर्देश मार्गालगतच्या ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे फेज एक व बाभळे येथे फेज दोन असे औद्योगिक वसाहती आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांमुळे वसाहतीची भरभराट होत आहे. मात्र, वसाहतीलगतचे तसेच आतील मार्गांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूकीला अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर वसाहतीतील कंपन्यांचे सामाजिक जबाबदारी निधी म्हणजे सीएसआर फंड व शासकीय निधीतून वसाहती भोवतालचे लाखो रुपये खर्चून सुमारे २७ किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण केले जात आहे. होळपासून डाबली, धांदरणे, गोराणे, माळीच, वाघोदे, वालखेडा, वाघाडी (खुर्द व बुद्रुक) ते सोनगीर असा हा मार्ग असून, औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना अतिशय सोयीचा आहे. दरम्यान, मार्गाच्या मध्यापासून साडेसात मीटर अंतराच्या आत येणारे पथदीप, सौर ऊर्जेचे पोल, जलवाहिनी किंवा मलनिस्सारण वाहिनींच्या जागा बदलाव्यात, असे शिंदखेडा तालुका बांधकाम विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस देऊन कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com