शाम नगरात घरफोडीचे सत्र सुरूच; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शाम नगरात घरफोडीचे सत्र सुरूच; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Published on: 
सेकंडमेन शहर टुडे पान चारसाठी ------------------- (पोतळी घेऊन जाणाऱ्या चोरट्याचे संग्रहित छायाचित्र वापरावे) ----------------------- जळगावच्या श्‍यामनगरात घरफोडीचे सत्र सुरूच ----- नागरिकांत भीती; सलग पाचव्या दिवशीही घटना, घरमालक बाहेरगावी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : शहरातील श्‍यामनगर परिसरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. सलग पाचव्या दिवशीही घरफोडीची घटना समोर आली आहे. परिसरात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. श्‍यामनगर परिसरातील एका घरात चोरट्यांनी प्रवेश करून घरफोडी केली. संबंधित घरमालक बाहेरगावी असल्याने घरात नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घरमालक परतल्यानंतर घराची पाहणी करून चोरीला गेलेल्या वस्तू व त्यांची किंमत स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून परिसरात घरफोडीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बंदघरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढली आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे, घरफोडीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी श्‍यामनगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.