13294
गुलाब देशमुख
-------------
सप्तशृंगी गडावर होमगार्डला दुखापत;
उपचारादरम्यान नाशिकला मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. २१ : सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सातबाभळ (ता. सुरगाणा) येथील होमगार्डचा (गृहरक्षक दल) रूग्णालया उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुलाब नारायण देशमुख (वय ४७) असे मृत होमगार्डचे नाव आहे.
सुरगाणा होमगार्ड पथकातील गुलाब देशमुख (सनद क्रमांक २०८२८१) हे गेल्या आठ ऑक्टोबरपासून सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव यात्रा बंदोबस्तासाठी तैनात होते. गडावरील पायऱ्यांजवळील बारी क्रमांक १० येथे त्यांची दिवसा ड्युटी होती. १७ ऑक्टोबरला रात्री आठला त्यांची ड्युटी संपल्यानंतर ते ‘ट्रस्ट भक्त निवास’ येथे विश्रांतीसाठी गेले होते. रात्री ११:४५ ला ते लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.
यानंतर सोबतच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांना तातडीने श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नाशिक येथील ‘बिरसा मुंडा व जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी (ता.१९) मृत्यू झाला.