वणीत बजरंग मित्र मंडळातर्फे महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम मानाच्या पैठणीसह १५ आकर्षक बक्षिसांची लयलूट; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वणीत बजरंग मित्र मंडळातर्फे महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम मानाच्या पैठणीसह १५ आकर्षक बक्षिसांची लयलूट; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on: 
फोटो ३ कॉलम फक्त VNI26B13303 वणी ः बजरंग मित्र मंडळातर्फे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी महिलांची झालेली गर्दी. ------------ ३६-३ वणीला होम मिनिस्टरमध्ये बक्षीसांची लयलूट ------------ मानाची पैठणी व १५ आकर्षक बक्षीसे ः जय बजरंग मित्र मंडळातर्फे आयोजन ------------ सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २२ : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून येथील जय बजरंग मित्रमंडळातर्फे महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम अँकर प्रतिभा पाटील- पुणेकर यांच्या उपस्थितीत झाला. महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विविध खेळांचा आनंद लुटला. मानाची पैठणी आणि १५ आकर्षक बक्षिसांची लयलूट हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. ---------- महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. त्यातून निवड झालेल्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. पहिल्या पाच विजेत्या महिलांना मातोश्री कलेक्शनतर्फे मानाची पैठणी देण्यात आली. मोठा कोळीवाडातर्फे पहिले बक्षीस म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर वंदना अंकुश जाधव यांना देण्यात आली. संदीप सोनार व सुशांत थोरात यांच्यातर्फे दुसरे बक्षीस फ्रिज सुवर्णा कोकाटे यांना तर संदीप मराठे व शुभम पाटील यांच्यातर्फे तिसरे बक्षीस वॉशिंग मशीन प्रज्ञा पगारे यांना देण्यात आले. रेणुका ट्रेडर्सतर्फे चौथे बक्षीस गायत्री देवराई यांना, अमोल जाधव व अक्षय गांगोडे यांच्यातर्फे पाचवे बक्षीस कपाट संगीता रवींद्र तुंगार यांना देण्यात आले. डॉ. प्रतीक शेलार यांच्यातर्फे सहावे बक्षीस फोल्डिंग बेड मंगला शेटे- कुंभार यांना, तर सचिन वाडेकर यांच्यातर्फे सातवे बक्षीस आकर्षक देव्हारा विमल कुंभार यांना देण्यात आला. वैभव सोनवणे यांच्यातर्फे आठवे बक्षीस सोफा शीतल गांगोडे यांना, दुर्गेश चितोडे यांच्यातर्फे नववे बक्षीस ड्रेसिंग टेबल डिंपल निकम यांना, तर संताजी मित्र मंडळातर्फे दहावे बक्षीस एलईडी टीव्ही शैला महाले यांना देण्यात आला. गौतम पैठणे यांच्यातर्फे अकरावे बक्षीस इलेक्ट्रिक गिझर ज्योती घुले यांना, अजय पवार यांच्या वतीने बारावे बक्षीस इलेक्ट्रिक गिझर मंगल गायकवाड यांना, चिंतामणी मेडिकल, बोरगाव यांच्या वतीने तेरावे बक्षीस ब्लूटूथ स्पीकर शीतल बागुल यांना, विकी नवले यांच्यातर्फे चौदावे बक्षीस कुलर नूतन गवारी यांना, तर आनंद भाऊ ठाकरे यांच्यातर्फे पंधरावे बक्षीस टेबल फॅन रखमा पवार यांना देण्यात आला. या कार्यक्रमास वणीचे उपसरपंच विलास कड, दिंडोरी बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत कड यांच्यासह वणीतील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मित्र मंडळांचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिला, स्पर्धक आणि जय बजरंग मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष गणेश कड, अध्यक्ष मनोज जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांचे हस्ते बक्षीसे वितरीत केले. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com