नाशिक- पंचवटीतील श्री काळाराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या पुजाऱ्यांना मंदिरातील दैनंदिन पूजाविधीसाठी २१ हजार रुपये दरमहा मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने मुंबई खंडपीठाने मंगळवारी (ता. १५) दिला आहे..पुजाऱ्यांना २०१९ पासून ट्रस्टच्या तत्कालीन अध्यक्षांच्या ठरावानुसार मानधन देणे बंद केले होते; परंतु त्यावर पर्यायी व्यवस्था न दिल्याने मुंबई खंडपीठाने ताशेरे ओढताना, विश्वस्त मंडळाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास ती व्यवस्था मंदिर पुजाऱ्यांना बंधनकारक असेल, असेही याचिका निकाली काढताना स्पष्ट केले आहे..मुंबई खंडपीठाचे न्यायाधीक्ष जी. एस. कुलकर्णी, न्यायाधीक्ष ए. एम. सेठना यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली. श्री काळाराम मंदिरातील पूजाविधीसाठी पुजाऱ्यांना परंपरेप्रमाणे मानधन दिले जात होते; परंतु २०१९ मध्ये श्री काळाराम मंदिर देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी पुजाऱ्यांना देण्यात येणारे २१ हजारांचे मानधन बंद केले होते. त्याविरोधात पुजाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज अंतिम सुनावणी झाली. .त्यानुसार, मंदिराच्या पूजाविधीसाठी ट्रस्टने पर्यायी व्यवस्था न देता मानधन बंद करण्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुजाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच २१ हजार रुपये दरमहा मानधन सुरू करावे, तसेच ट्रस्टनेही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास ती व्यवस्था पुजाऱ्यांना बंधनकारक असेल, असेही निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा वाद उद्भवण्याची शक्यता राहिलेली नाही. ॲड. सत्यजित दिघे यांनी ट्रस्ट, तर ॲड. प्रमोद जोशी यांनी पुजाऱ्यांच्या वतीने युक्तिवाद केला..देवस्थान ट्रस्टचाही ठरावगेल्या आठवड्यात जिल्हा प्रधान न्यायाधीशांनी श्री काळाराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी न्या. श्रीमती आर. एन. पांढरे यांची नियुक्ती केली. त्यानंतर सोमवारी (ता. १४) ट्रस्टच्या विश्वस्तांची बैठक होऊन त्यात मंदिरांच्या पूजाविधीसाठी पर्यायी व्यवस्था ट्रस्टकडे नाही. त्यामुळे पुजाऱ्यांना २०१६ प्रमाणे २१ हजार रुपये मानधन व २०१९ पासून थकीत मानधन १२ टक्के व्याजाने अदा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला..देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त आणि पुजारी यांच्यात तांत्रिक कारणावरून वाद होता. तो उच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिटला आहे. यापुढे देवस्थानची विकासकामे आणि भाविकांसाठी नवीन सोयी-सुविधा उभारण्यावर भर दिला जाईल. -शुभम मंत्री, विश्वस्त, श्री काळाराम मंदिर देवस्थान ट्रस्ट, पंचवटी .Sankashti Chaturthi 2025: आज संकष्टी चतुर्थीला या राशींच्या व्यक्तींवर होईल बाप्पाची विशेष कृपा, होईल आर्थिक लाभ आणि यश!.उच्च न्यायालयाचा निकाल हाती आलेला नाही; परंतु पुजाऱ्यांचे मानधन पूर्ववत आणि थकीत रक्कम व्याजासह देण्यासंदर्भात मागील तारखेलाच विषय झाला होता. निर्णयाचे स्वागत आहे. यापुढे विश्वस्त आणि पुजारी भाविकांच्या सोयी-सुविधांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक कामकाज करील.-सुशील पुजारी, पूजाधिकारी, श्री काळाराम मंदिर देवस्थान ट्रस्ट, पंचवटी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.