--
धुळे ः टुडे ३ साठी
--
फोटो क्रमांक ः 31610
धुळे : टॉपलाईन रिसॉर्टमध्ये मंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार स्वीकारताना भाजपचे नेते ओमप्रकाश अग्रवाल. शेजारी आजी- माजी आमदार, सर्वपक्षीय पदाधिकारी.
--
उद्योजक अग्रवाल यांचा धुळ्यात सत्कार
-
अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रम; प्रेरणात्मक कार्याचाही गौरव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक ओमप्रकाश पुरणमलजी अग्रवाल (ओपी शेट) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त धुळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतदार सोहळा पार पडला. मुंबई- आग्रा महामार्गावरील टॉपलाइन रिसॉर्टमध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमात समितीतर्फे त्यांचा सन्मानपत्र देऊन कृतार्थ गौरव करण्यात आला. या वेळी त्यांच्या संघर्षशील जीवनावरील चित्रफितीसह उपस्थितांनी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
आमदार अनुप अग्रवाल यांनी कुटुंबीयांतर्फे धुळेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमदारकीच्या वेतनातून ११ लाखांचा निधी दुष्काळी मदतीसाठी, वृद्धाश्रमासाठी दर वर्षी दोन लाख आणि देवगिरी कल्याण आश्रमाला एक लाखाची देणगी देण्याची घोषणा त्यांनी केली. पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, काशीराम पावरा, मंजुळा गावित, राजूमामा भोळे, अमोल जावळे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी, ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक, ज्येष्ठ उद्योजक विनोद मित्तल, डॉ. महेश घुगरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी प्रमुख पाहुणे होते.
-
वसा पुढे चालवावा
पालकमंत्री रावल यांनी ओपी अग्रवाल यांनी निरपेक्ष भावनेने केलेल्या संघर्षातून आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या राजकारणातून हा वटवृक्ष फुलल्याचे त्यांनी नमूद केले. वस्त्रोद्योगमंत्री सावकारे यांनी ओपी अग्रवाल यांनी दिलेले संस्कार आणि संघर्षाची वाट ही आजच्या तरुण पिढीला आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अमरिशभाई पटेल यांनी सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देत ओपी अग्रवाल यांच्या विचारांची व संस्कारांची कास धरत आमदार अनुप अग्रवाल समाजसेवेचा वसा पुढे चालवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. प्रकाश पाठक यांनी ओपी अग्रवाल यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, जिद्द आणि माणसे जोडणारा असून तो प्रत्येकासाठी अनुकरणीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
भजनाने रंगला सोहळा
तत्पूर्वी, रविवारी (ता. ४) खानदेश गोशाळेच्या मैदानावर गायक हंसराज रघुवंशी यांच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर चिंब झाले. दुष्काळजन्य स्थितीचे समाजभान राखत अग्रवाल कुटुंबाने ११ शेतकऱ्यांना वासरांसह दुभत्या गायींचे दान आणि साडी- चोळीचा आहेर देत सन्मान केला. यानंतर रघुवंशी यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांवर धुळेकरांनी ठेका धरला.