Nashik News : मनमाड तालुका निर्मितीच्या आशा उंचावल्या; शासनाकडून पुनर्रचना समितीची पुनर्गठन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Planned Prospective Manmad Taluka Map

Nashik News : मनमाड तालुका निर्मितीच्या आशा उंचावल्या; शासनाकडून पुनर्रचना समितीची पुनर्गठन

नांदगाव (जि. नाशिक) : राज्यभरातील महसूल विभागाच्या कामकाजातील सुसूत्रता आणण्यासाठी नव्या तालुक्याच्या निर्मिती साठी शासनाकडून तालुका विभाजनसाठीच्या सुधारित निकष निश्चितीसाठी पुन्हा एकदा नव्याने राज्यस्तरीय तालुका पुनर्रचना समितीची पुनर्गठन करण्यात आले आहे.

शासनाकडून समितीचे गठण झाल्याने जिल्ह्यातील मनमाड शहरास तालुका होण्याच्या आशा उंचविल्या आहे. (Hopes raised for creation of Manmad Taluka Reconstitution of Reorganization Committee by Govt Nashik News)

कोकणचे विभागीय आयुक्त या समितीचे अध्यक्ष असून पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर येथील महसूल आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनमाड, नामपूरसह राज्यभरातून करण्यात येणाऱ्या वर्षानुवर्षेच्या मागणीचा विषय मार्गी लागण्याची शक्यता दिसू लागली आहे.

तत्कालीन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नांदगाव-मनमाड भेटी दरम्यान नव्या तालुक्याच्या मागणीला हिरवा कंदील होता. आता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन काळात पुन्हा एकदा या विषयाला चालना दिली आहे. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनीही सकारात्मकता दाखवीत यासंबंधीचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरु ठेवलेला होता.

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने अशा तालुक्यांचे विभाजन करण्याबाबतचे बहुतांशी प्रस्ताव अनेक प्रलंबित होते. आता या विषयाला चालना मिळाल्याने शासनाकडून नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.

त्यात महसुली सजांचे वर्गीकरण व अन्य नव्या बाबी याचा विचार करून नजीकच्या काळात नवतालुका निर्मितीचे धोरण जाहीर होण्यासाठीच्या निकषांची पूर्तता यावर समितीच्या अभिप्रायाला त्यामुळे महत्त्व प्राप्त आले आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

समितीला सहा महिन्याच्या आत नव्या तालुका निर्मितीबाबतचा आपला अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. यामुळे नियोजित मनमाड तालुक्यासाठी नांदगाव तालुक्यातील ३१ गावे, चांदवडमधील २२, येवल्यातील १३ तर मालेगाव तालुक्यातील सात गावांचा असे मिळून ७४ गावांचा समावेश करीत नियोजित संभाव्य मनमाड तालुका आकाराला यावा असा प्रस्ताव आहे.

संभाव्य मनमाड तालुक्यातील गावे

नांदगाव : मनमाड, वंजारवाडी, सटाणे, अनकवडे, माळेगाव कर्यात, एकवई, कऱ्ही, नारायणगाव, घाडगेवाडी, हिसवळ बुद्रक, हिसवळ खुर्द, शास्त्रीनगर, हिरेनगर,

धोटाणे खुर्द, घोटाने बुद्रक, बेजगाव, भालूर, लोहशिंगवे, मोहेगाव, नागापूर, पांझणदेव, पानेवाडी, कोंढार, धनेर, अस्तगाव, खादगाव, अस्तगाव, भार्डी, बोयेगाव, नवसारी, दऱ्हेल, नांदूर.

चांदवड : कानडगाव, कुंदलगाव, निमोण, डोणगाव, मेसनखेडे बुद्रक, कोंकणखेडे, अहिरखेडे, दरेगाव, वराडी, वाद, पिंपळगाव दाबली, मेसनखेडे खुर्द, शिंगवे, तळेगाव रोही, वाघदर्डी, भडाणे, रायपूर, वडगाव पंगु, रापली, कातरवाडी, निंबोळे.

येवला : अनकाई, गोरखनगर, विखरनी, कातरणी, बाळापुर, विसापूर, गुजरखेडे, कानडी, तांदुळवाडी, चांदगाव, मुरमी, आडगाव, वसंतनगर.

मालेगाव : जळगाव, निंबायती, काळेवाडी, चोंडी, एरंडगाव, सावकारवाडी, झाडी, घोडेगाव चौकी.