नाशिक- ऑफलाइन परवानगीसंदर्भात वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने महापालिका हद्दीतील रुग्णालये, नर्सिंग होम, शुश्रूषागृहांना आता ऑनलाइन परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. ३६ रुग्णालयांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर ५८ रुग्णालयांची कागदपत्रे पूर्ण असल्याने परवाना नूतनीकरण करण्यास संमती देण्यात आली आहे.