नाशिक- बांधकामावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम गुणवत्तापूर्वक व उत्तम दर्जाचे असावे. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत आरोग्यविषयक विविध चाचण्या करण्यासाठी तयार केलेल्या प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात. आरोग्यविषयक सेवा देणारे दवाखाने व प्रयोगशाळा इमारतींच्या सुरू असलेल्या कामांची अंदाजपत्रकासह नमूद सर्व बाबींसह तपासणी केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले.