नाशिक नामांकित हॉटेल खून प्रकरण : संशयिताचा जेलमध्ये मृत्यू

nashik jail
nashik jailesakal

नाशिक रोड : सिडको भागातील सोनाली मटण भाकरी (sonali mutton bhakari) या हॉटेलमध्ये बसण्यावरून वाद होऊन एकाचा खून झाला होता. शहरात फक्त पार्सल सेवेला परवानगी असतांना सिडको आणि अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे हॉटेल सुरु असल्याचे या निमित्ताने उघड झाले होते. ३ ते ४ जणांनी तरुणाच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करून खून केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलीसांनी रात्री दोघांना ताब्यात घेतले होते. न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित अतुल सुभाष पिठेकर (वय १९) याचा मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला.

नाशिक नामांकित हॉटेल खून प्रकरण : संशयिताचा जेलमध्ये मृत्यू

स्टेट बँक चौकाजवळील सोनाली हॉटेलमध्ये २८ जुलैला रात्री पावणेदहाच्या सुमारास प्रसाद भालेराव (२५, रा. राजवाडा, देवळाली गाव) हे मित्रांसमवेत जेवण करायला गेले होते. या वेळी अतुल पिठेकर, नीलेश दांडेकर (दोघे रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानागर) यांच्यासोबत त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. याचा राग मनात धरून पिठेकर व दांडेकर यांच्यासह चार ते पाच युवकांनी हॉटेलबाहेर शनी मंदिरासमोर प्रसाद यांना मारहाण करीत डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली होती. त्यापैकी अतुल पिठेकर हासुद्धा मध्यवर्ती कारागृहात होता. रविवारी (ता. २२) सकाळी अतुलला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कारागृह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अबिद अबू अत्तर यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सिडको भागातील हॉटेल सोनालीमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून नाशिक रोड येथील युवकाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित अतुल सुभाष पिठेकर (वय १९) याचा मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाला.

nashik jail
OBC Reservation : छगन भुजबळ घेणार कपिल सिब्बल यांची भेट
nashik jail
शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार पुष्पा पाटील यांच्‍याकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com