नालाकाठावरील घर कोसळले; इमारतीचा अर्धा भाग नष्ट, जिवितहानी टळली

Fallen part of house
Fallen part of houseesakal

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : शहरातील मच्छी मार्केटजवळ नवाबाजार परिसरातील असलम खान इनामदार यांच्या राहत्या घराच्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला. मंगळवारी (ता.३१) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेवेळी लहान मुले बाहेर खेळत होती. माती पडत असताना घरातील महिलेने प्रसंगावधान राखत मुलांना तात्काळ बाजूला केले आणि वरील मजल्यावर काम करणाऱ्या महिला नुकत्याच स्वयंपाकाचा गॅस बंद करून खाली आल्यामुळे, त्यामुळे मोठी जिवितहानी टळली. (House fallen incident in igatpuri no casualties were reported Nashik News)

नगरपरिषदेने घटनेची पूर्वकल्पना देत परिसरातील इतर जुन्या इमारती व खचलेल्या नाल्याबाबत तातडीने माहिती दिली. या भागातील नाला, जिर्ण झालेले मटण मार्केट, मच्छी मार्केटसह नविन बांधकाम तत्परतेने करण्यात यावे अशी मागणी केली.

Fallen part of house
शालेय साहित्य खरेदीची तयारी : किंमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या

या घटनेत खचलेल्या इमारतीच्या मलब्यात खान कुटुंबाचे सर्व घरातील किंमती संसारोपयोगी साहित्य आणि महत्वाची कागदपत्रे असे सुमारे चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या भागातील नाल्यावर मोठया प्रमाणात नागरी वस्तीचे अतिक्रमण झाले असून नाल्याचे पाणी आडले जात आहे. यात घनकचरा, उंदिर, घुसीचा फैलाव होवुन आसपासचे घरे, इमारती, कार्यालये, दुकाने यांची बांधकामे झाल्यामुळे परिसराच्या भागात धोका निर्माण झाल्याने अनेकदा साफसफाई कामी अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे आरोग्य निरीक्षक यशवंत ताठे यांनी माहिती दिली.

Fallen part of house
पिंपळगाव शहरातील 13 पैकी 7 पेट्रोलपंप ड्राय

"शहरात अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम करताना अतिक्रमण केले आहे. बांधकामाची कोणत्याही प्रकारची परवानगी देखील घेतली नाही. अशा बांधकाम धारकांना नोटीसा पाठविणार आहे. नालेसफाईसाठी नगरपालिका प्रशासनाने जेसीबी लावला आहे. लवकरच ठराव घेऊन नविन मच्छी मार्केट बांधणार आहोत."

- पंकज गोसावी, मुख्याधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com