नाशिक : पाठपुरावा किती दिवस करणार, कृती करा!

मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाची हाक, आता शेतकऱ्यांना गृहीत धरणे सोडण्याचा इशारा
पाठपुरावा किती दिवस करणार, कृती करा!
पाठपुरावा किती दिवस करणार, कृती करा! sakal

अस्वली स्टेशन : स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या राजकारण्यांनो, बळीराजाला गृहीत धरु नका. अवकाळीने नुकसानीच्या मदतीसाठी नुसता पाठपुरावा किती दिवस करणार, प्रत्यक्ष कृती करा आणि सरकारला मदतासाठी भाग पाडा अशी आर्त हाक तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. एक महिना होऊनही ना पुरेसे पंचनामे, ना विम्याच्या रकमेसाठी ठोस कृती, केवळ शेतकऱ्यांना देखाव्यासाठी मदतासाठी पाठपुरावा करण्याचे सांगू नका अन्यथा जनता आता तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवेल असा इशाराही संतापलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

तालुक्यात दिवाळीआधी झालेला पाऊस आणि नंतर अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकरी पुरता उद्धस्त झालेला आहे. नुकसानग्रस्तांना पिकविम्याची भरपाई नाही, सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी रक्कमही मिळालेली नाही. हाती दमडी नसतांना वीज वितरण कंपनी वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपंपाचा पुरवठा खंडित करत आहे. चहूबाजूने शेतकरी अडचणीत असताना केवळ पाठपुरावा करून कसे चालेल, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृती दाखवा तरी असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकरी अस्मानी संकटात सापडलेला असताना सर्वच लोकप्रतिनिधी मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नियोजनात व्यस्त आहेत.

पाठपुरावा किती दिवस करणार, कृती करा!
औरंगाबाद : जलजीवन मिशनचे तत्काळ आराखडे तयार करा

मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, अनेक दिवसांपासून सरकारचे प्रतिनिधी, मंत्री तसेच वरिष्ठ नेते सभांमध्ये सांगत आहेत की पीक विम्यासंदर्भात पाठपुरावा सुरु आहे. मुळात पीकविमा कंपन्या सरकारला जुमानत नसल्याचे सिद्ध झालेले आहे,मग ही दिशाभूल की वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे असा आरोपही तज्ज्ञ शेतकरी तथा शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

"अवकाळीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असूनही महिना उलटूनही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम नाही. नुकसान भरपाईही नाही. लोकप्रतिनिधी मात्र केवळ पोकळ अश्वासन देवून संकटात असलेल्या बळीराजाची दिशाभूल करीत आहे."

- भाऊसाहेब मुसळे, नुकसान ग्रस्त शेतकरी.

"अवकाळीमुळे भातपीक पूर्णतः बाधित झाल्याने शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे. आता बळीराजाला सरकारी मदतीची आस लागून आहे. मात्र उदासीन सरकार, निगरगट्ट लोकप्रतिनिधी आणि सुस्त प्रशासनामध्ये प्रामुख्याने शेतकरी भरडला जात आहे."

- पाडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, इगतपुरी

पाठपुरावा किती दिवस करणार, कृती करा!
नांदेड : बहाद्दरपुरातील मन्याडवरील पूल बनला धोकादायक

"सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र अद्यापही ती तुटपुंजी रक्कमही मिळालेली नाही. ना पिकविमा शेतकरी कृती समितीतर्फे निवेदन देऊनही वेळोवेळी पाठपुरावा करूनही आमदारांच्या पोकळ आश्वासनांव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा पडली आहे."

- दशरथ पागेरे, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती

"एकीकडे कोरोनाचे आर्थिक संकट तर दुसरीकडे कर्जबाजारीपणा, अशा स्थितीत भाताची झालेली वाताहत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेली. मागील वर्षीच्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. सरकारने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी हीच माफक अपेक्षा "

- जगन घोडे, शेतकरी, घोडेवाडी, ता. इगतपुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com