सातपूर- उद्योगाच्या अस्तित्वासाठी एचआरची भूमिका महत्त्वाची असते. मालक आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. त्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर कोणताही किचकट प्रश्न सोडविण्यात मदत होते, असे प्रतिपादन कामगार उपायुक्त विकास माळी यांनी केले.