नाशिक- राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचा नाशिक जिल्हा असूनही येथे कृषी विभागातील दोन महत्त्वाची पदे कृषी अधीक्षक व कृषी उपसंचालक गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. सद्यःस्थितीत या पदांचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे दिला असून, पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.