Saptashrungi Devi Gad : आदिमायेस सफेद महावस्राची बांधली पूजा; सप्तशृंगगडावर भाविकांची अलोट गर्दी

MLA Nitin Pawar, Jayshree Pawar, Trustee Lalit Nikam present during the Panchamrit Mahapuja of the second rosary in the Sharadiya Navratri festival of Adimaya Saptshringi on Monday.
MLA Nitin Pawar, Jayshree Pawar, Trustee Lalit Nikam present during the Panchamrit Mahapuja of the second rosary in the Sharadiya Navratri festival of Adimaya Saptshringi on Monday.esakal

Saptashrungi Devi Gad : ‘या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। अर्थात शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेस ब्रह्मचारिणी रूपातील आदिमाया सप्तशृंगीस सफेद रंगाचे महावस्त्र नेसवून साजशृंगार करीत पूजा बांधण्यात आली होती.

नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांपैकी एक किंवा दुसऱ्या रूपाशी संबंधित आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीशी संबंधित आहे, देवीचे दुसरे रूप. (huge crowd of devotees at Saptshringigarh navratri nashik news)

आज देवी ब्रह्मचारिणीच्या रूपात पूजन होते. येथे ‘ब्रह्म’ शब्दाचा अर्थ तपश्चर्या आणि ‘ब्रह्मचारिणी’ म्हणजे जो तपस्या करतो तो. देवीचे हे रूप शाश्वत फळ देणारे आहे.

आजच्या दिवशी जो कोणी देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतो, तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात विजय मिळवण्याची शक्ती मिळवू शकतो, असे म्हटले जाते. यामुळे व्यक्तीमध्ये संयम, कठोर परिश्रम घेण्याचे मनोबलदेखील वाढते. त्याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर श्री भगवतीच्या नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेनिमित्त सुमारे २५-३० हजार भाविकांनी गडावर हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले.

MLA Nitin Pawar, Jayshree Pawar, Trustee Lalit Nikam present during the Panchamrit Mahapuja of the second rosary in the Sharadiya Navratri festival of Adimaya Saptshringi on Monday.
Nashik Kalika Mandir : बैठक अवस्थेतील कालिकामातेच्या एकमेव मंदिरात नवरात्रोत्सव सुरू

श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन झाले. आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगड येथे सप्तशृंगी देवीचा आश्विन नवरात्रोत्सवातील दुसऱ्या माळेला कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार, जयश्री पवार व श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. ललित निकम यांच्या हस्ते श्री भगवतीस पंचामृत अभिषेक, महापूजा करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही श्री भगवती चरणी नतमस्तक झाले.

त्याच्या हस्ते भगवतीची संकल्प आरती करण्यात आली. तहसीलदार तथा विश्वस्त रोहिदास वारुळे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यकारी अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभागप्रमुख यशवंत देशमुख, मंदिर सहाय्यक विभागप्रमुख विश्वनाथ बर्डे, पर्यवेक्षक प्रशांत निकम, सुनील कासार, गोविंद निकम यांसह ट्रस्ट कर्मचारी, पुरोहित संघाचे सदस्य, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

MLA Nitin Pawar, Jayshree Pawar, Trustee Lalit Nikam present during the Panchamrit Mahapuja of the second rosary in the Sharadiya Navratri festival of Adimaya Saptshringi on Monday.
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगीदेवी मंदिराच्या गाभाऱ्यास चांदीतील नक्षीकामाचा नवा साज; 465 किलो चांदीचा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com