kamgar Natya Spardha : कामगार नाट्य स्पर्धेत ‘हम दो नो’ ची बाजी! नाशिक केंद्र द्वितीय तर संगमनेर तृतीय

६९ व्या कामगार कल्याण मंडळ नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्राने बाजी मारली असून, ‘हम दो नो’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
The winning team receiving the award from dignitaries at the 69th Labor Drama Competition.
The winning team receiving the award from dignitaries at the 69th Labor Drama Competition. esakal

नाशिक : ६९ व्या कामगार कल्याण मंडळ नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्राने बाजी मारली असून, ‘हम दो नो’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सोमवारी (ता. २९) नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर झाले.

नाशिकचे मुंबई मॉन्सून द्वितीय, तर संगमनेर केंद्राचे प्रथम पुरुष नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ. सोमनाथ मुटकुळे, आमदार सीमा हिरे, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितीन वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. (Hum Do No wins in kamgar Natya Spardha Nashik center second and Sangamner third)

२ जानेवारीपासून कामगार नाट्य स्पर्धेचा हा नाट्यसंग्राम सुरू झाला होता. यात २० नाटकांचे सादरीकरण झाले. हेमंत गव्हाणे, सुनील सुळेकर, पल्लवी कदम यांनी नाट्य स्पर्धेचे परिक्षण केले. प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त नाशिक यांनी पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक केले. शशिकांत पाटोळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

निकाला असा (कंसात नाटकाचे नाव)

आपुलाची वाद आपणांसी व दानव या नाटकांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

उत्कृष्ट अभिनय पुरुष : अम्मार मोकाशी (हम दो नो) प्रथम, सुयोग कुलकर्णी (मुंबई मॉन्सून) द्वितीय, प्रणिल तिवडे (आपुलाची वाद आपुणांसी) तृतीय, विक्रम गवांदे (दानव) उत्तेजनार्थ, भूषण खैरनार (विठ्ठला) उत्तेजनार्थ, कुणाल घोटेकर (मुंबई मॉन्सून) उत्तेजनार्थ, प्रियपाल दशांती (प्रथम पुरुष) उत्तेजनार्थ, बाळासाहेब शेलार (बायको पाहावी सांभाळून) उत्तेजनार्थ, विकास पालखेडकर (धर्ममाया) उत्तेजनार्थ, पार्थ गाजरे (रातमतारा) उत्तेजनार्थ, अमोल थोरात (शरणम् शांती) उत्तेजनार्थ, सुमीत राठोड (पेढे वाटा पेढे), राजीव हाडके (नाव झालंच पाहिजे)

The winning team receiving the award from dignitaries at the 69th Labor Drama Competition.
Nashik News : ग्रंथ समजले तर संत समजतील : गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे

उत्कृष्ट अभिनय महिला : नेहा पवार (हम दो नो) प्रथम, गायत्री नेरपगारे (प्रथम पुरुष) द्वितीय, विशाखा सपकाळे (ती) तृतीय, सृष्टी शिरवाडकर (मुंबई मॉन्सून) उत्तेजनार्थ, शुभांगी वाडीले (म्याडम) उत्तेजनार्थ, मृदुला बारी (ती) उत्तेजनार्थ, केतकी कुलकर्णी (आपुलाची वाद आपुणांसी) उत्तेजनार्थ.

दिग्दर्शन : अपूर्वा कुलकर्णी (प्रथम), राजेश टाकेकर (द्वितीय), संकेत सीमा विश्वास भामरे (तृतीय)

उत्कृष्ट नेपथ्य : किरण भोईर (प्रथम), विक्रम गवांदे (द्वितीय), हरिकृष्ण डिडवाणी (तृतीय)

पार्श्वसंगीत : सचिन रहाणे (आपुलाची वाद आपणांसी) प्रथम, रोहन वाघ (धर्ममाया) द्वितीय, महेंद्र खेडकर (विठ्ठला) तृतीय.

प्रकाशयोजना : विनोद राठोड (दानव) प्रथम, कृतार्थ कंसारा (शरणम् शांती) द्वितीय, विशाल जाधव (म्याडम) तृतीय.

उत्कृष्ट नाट्यलेखन : संगीता फुके (तीन दिवसांची पाहुणी)

The winning team receiving the award from dignitaries at the 69th Labor Drama Competition.
Mumbai: अनिवासी भारतीयांना रिटेल क्षेत्रात गुंतवणुकीस प्रोत्साहन द्यावे; मसालाकिंग डॉ. दातारांची आगामी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com