पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार
Published on: 
चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार आडगाव शिवारातील घटना; पतीविरोधात गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता ९ : चारित्र्यावर संशय घेऊन दारूच्या नशेत पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची आणि धक्काबुक्की करत जिण्यावरून खाली पाडून दुखापत केल्याची गंभीर घटना आडगाव शिवारात घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या फिर्यादीनुसार, संशयित पतीला दारूचे व्यसन आहे. ते सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण व मारहाण करत. . या त्रासामुळे पीडित महिला मागील १० महिन्यांपूर्वी शिर्डी येथील भावाकडे राहण्यास गेली होती. त्यानंतर नातेवाइकांनी समजावल्याने त्या गेल्या महिन्यात पुन्हा सासरी परतल्या होत्या. शनिवारी (ता. ७) रात्री पती दारू पिऊन घरी आले आणि चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विरोध केला असता, धमकी देत चाकूने त्यांच्यावर वार केला. यात त्यांच्या डाव्या कानाखाली मानेवर चाकू लागून जखम झाली. तसेच धक्काबुक्की केल्यामुळे त्या रो-हाऊसच्या वरील मजल्यावरून जिण्याच्या पायऱ्यांवरून घसरत खाली पडल्या, ज्यामुळे पाठीस, खुब्यास, हातास व कमरेस मुका मार लागला. घटनेनंतर शेजारील मावशी व भावाच्या मदतीने त्यांना तपोवन रोडवरील सदगुरू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्या मानेवरील जखमेवर टाके टाकण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी आडगाव ठाण्यात येऊन फिर्याद दिली. याप्रकरणी हवालदार सुनील बहीरम पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.