लोगो : मार्केट अपडेटस्
----
NSK26H34036
जळगाव : हुंडई बेयॉन कारचे अनावरण करताना धर्मेंद्रकुमार सिंग, गेव पाजनीगारा, अशोक बेदमुथा, येझदी पाजनीगारा, प्रदीप गिरासे.
----
फोकस हुंडईमध्ये नवीन
‘बेयॉन’चे शानदार अनावरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३० : भारतीय चारचाकी वाहन उद्योगातील विश्वासार्ह नाव म्हणून हुंडईने नवीन ‘बेयॉन’ चारचाकी बाजारात आणली असून त्याचे येथील फोकस हुंडई येथे अनावरण करण्यात आले.
ग्राहकांच्या गरज व पसंतीच्या विश्वासार्ह परंपरेचा वारसा पुढे नेत फोकस हुंडई गेल्या २० वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात हुंडईचे अधिकृत विक्रेते म्हणून ग्राहकांना उत्कृष्ट विक्रीसेवा आणि विक्रीपश्चात सेवा देत आहे.
हुंडई बेयॉनचे अनावरणप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी धर्मेंद्रकुमार सिंग, फोकस हुंडईचे संचालक येझदी व गेेव पाजनीगारा, मनराज मोटर्सचे अशोक बेदमुथा, प्रदीप गिरासे आदी उपस्थित होते.
ही एसयूव्ही आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत सुरक्षा, आरामदायी सुविधा आणि दमदार कामगिरी यांचा उत्कृष्ट संगम आहे. यामध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन असून ते ११५ पीएसची कमाल शक्ती आणि १४३.८ एनएम टॉर्क निर्माण करते. ग्राहकांसाठी ६-स्पीड मॅन्युअल आणि इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन असे पर्याय उपलब्ध आहेत.
-----