Innovation Fest: इंजिनिअरिंग क्लस्टरतर्फे आयडिया स्पार्क : इनोव्हेशन फेस्ट

नावीन्यपूर्ण कल्पनाविष्कारासाठी एक लाखाचे पारितोषिक, दोन वर्षे मार्गदर्शन
Innovation
Innovationesakal

Innovation Fest : नाशिक अभियांत्रिकी क्लस्टरतर्फे जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी नवोन्मेषी तरुणांसाठी ‘आयडिया स्पार्क इनोव्हेशन चॅलेंज- २०२३’ ही स्पर्धा होणार आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २१) स्पर्धेच्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन झाले.

स्पर्धेत अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शर्मा यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष मनीष कोठारी, संचालक विक्रम सारडा, नरेंद्र गोलिया, नरेंद्र बिरार, मुख्य अधिकारी माथूर उपस्थित होते. (Idea Spark by Engineering Cluster Innovation Fest nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

कोठारी म्हणाले, की अभियांत्रिकी क्लस्टरशी संबंधित मार्गदर्शन, उत्पादन विकास, प्रमाणीकरण आणि चाचणी, उद्योग जोडणी आणि व्यवसाय धोरण समर्थन मिळविण्यासाठी क्षेत्रातील ग्रामीण भागातील नवोन्मेषक उद्योजकांना संधी देण्यासाठी यंदा अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह,

मोबिलिटी सोल्यूशन्स, संरक्षण आणि एरोस्पेस, अॅग्रीटेक, कचरा व्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि कौशल्य विकास तसेच सामाजिक प्रभाव यावर आधारित ही स्पर्धा असेल. स्पर्धा सर्वांसाठी खुली आणि पूर्णपणे विनामूल्य आहे.

Innovation
Nashik News: भुयारी गटारीला मुहूर्त कधी लागणार? निविदा उघडण्यास विलंब संशयास्पद

इच्छुक नवोदित उद्योजक त्यांच्या कल्पना QR कोड स्कॅन करून किंवा https://tinyurl.com/ideaspark2023 यावर ५ ऑक्टोबरपर्यत ऑनलाइन अर्ज करून स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कल्पनांना एक लाखाचे रोख पुरस्कार दिले जातील.

निवडलेल्या प्रत्येक नवोदिताला अभियांत्रिकी क्लस्टरद्वारे त्यांच्या कल्पना, उत्पादन किंवा सेवेचे यशस्वी व्यावसायिक उपक्रमात रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शन केले जाणार आहे.

Innovation
Nashik BJP News: भाजपच्या कार्यकारिणीत नांदगावकरांचा वरचष्मा! संजय सानपांवर सरचिटणीसपदाची धुरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com