जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यात इफ्तार पार्टी | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Iftar Party

भद्रकाली पोलिस ठाण्यात इफ्तार पार्टी

जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील इफ्तार पार्टी निमित्ताने तुम्हा सर्वांची भेट झाली. भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.

रमजाननिमित्त (Ramadan) भद्रकाली पोलिस ठाण्यात इफ्तार पार्टी झाली. या वेळी ते बोलत होते. सायंकाळी रोजा इफ्तारची वेळ झाल्याने धार्मिक परंपरा विधीनुसार दुआ पठाण करत रोजा इफ्तार करण्यात आला. या वेळी पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह अन्य विभागाचे सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, साजन सोनवणे, निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी तसेच माजी नगरसेविका समिना मेमन, वत्सला खैरे, हाजी झाकिर, अशोक पंजाबी, वसीम पीरजादा, अक्रम खतीब, अजीम सय्यद आदी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी पोलिस आयुक्तांनी भद्रकाली पोलिस ठाण्याला भेट देत पाहणी केली. कामकाजाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे परिसराची माहिती करून घेण्यात आली.