Bhavali Waterfall Tourist Attack : नाशिकच्या प्रसिद्ध भावली धबधब्यावर पर्यटकांना घेरलं! कुटुंबाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, विनयभंग अन् लूटमार; इगतपुरीत नेमकं काय घडलं?

What Happened at Bhavali Waterfall in Igatpuri? : इगतपुरीतील भावली धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटक कुटुंबावर सात जणांच्या टोळीने हल्ला, विनयभंग, लूटमार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे.
Igatpuri Bhavali Waterfall tourist attack

Igatpuri Bhavali Waterfall tourist attack

esakal

Updated on

इगतपुरी शहर (नाशिक) : तालुक्यातील प्रसिद्ध भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिक रोड येथील पर्यटक कुटुंबावर सात जणांच्या टोळीने विनयभंग, लूटमार आणि ठार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १२) घडली. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात सात अनोळखी संशयित (Nashik tourist family assault case) आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून, संशयितांचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com