Dairy Business
sakal
लक्ष्मण सोनवणे-गोंदे दुमाला: इगतपुरी तालुक्यातील पशुपालक शेतकरी पारंपरिक शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन आर्थिक उन्नती साधत आहेत. शेतकऱ्यांबरोबरच तरुण पिढी, महिलावर्ग दुग्धव्यवसायाकडे वळले. या व्यवसायामुळे अनेक बेरोजगार हातांना काम मिळाले असून, दुग्धव्यवसायाने शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला आकार दिला आहे. वाढते पशुधऩ आणि वाढता खर्च यामुळे व्यवसायात सतत चढ-उतार येत असले, तरी बेभरवशाच्या शेतीपेक्षा दुग्धव्यवसाय नक्कीच चांगला, असे म्हणत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात यात गुंतला आहे, हे विशेष.