नाशिक- आडवण-पारेगाव (ता. इगतपुरी) येथे औद्योगिक वसाहतीसाठी सर्व्हेक्षण करण्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. सर्व्हेक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भूमिहीनांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.