इगतपुरी : विजय पगारे : Exclusive : इगतपुरी तालुक्यात भातशेती करपल्याने बळीराजा हतबल : नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी : घनदाट वनक्षेत्रामुळे परिसरात वन्यजीवांचा वावर वाढला :

इगतपुरी : विजय पगारे : Exclusive : इगतपुरी तालुक्यात भातशेती करपल्याने बळीराजा हतबल : नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी : घनदाट वनक्षेत्रामुळे परिसरात वन्यजीवांचा वावर वाढला :
Published on: 
पान दोन ॲंकर ----- 08832 बेलगाव तऱ्हाळे (ता.इगतपुरी ) : परिसरातील करपलेली भातशेती दाखवताना पांडुरंग वारूंगसे. शेजारी इतर शेतकरी. भातशेती करपल्याने इगतपुरीत बळीराजा हतबल तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी; रब्बी हंगाम हातातून जाण्याची भीती सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.२१ : तालुक्यासह पूर्व भागात पावसाअभावी भातशेती पूर्णपणे करपल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच विजेच्या लपंडावामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. ऐन दाना भरणीत इगतपुरी तालुक्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने पूर्ण पीक वाया गेले आहे. त्यातच पडत असलेले कडक ऊन, पिकांना पाणी देण्याची गरज असताना शेतीपंपांसाठी नियमित वीजपुरवठा होत नसल्याने येथील भातशेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी पिके करपली आहे. अपुरा पाऊस, अनियमित वीजपुरवठा यामुळे हातातोंडाशी आलेला घास देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत निघून गेला आहे. इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले असून, उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होत आहेत. धरणात पाणी दिसते पण विजेच्या अभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गाव वाडी वस्ती शिवारातील निर्माण झाला आहे. जमिनीतील ओलावा नसल्याने खरीप तर गेलाच पण रब्बी पिके ही होणार नाही. त्यामुळे पुढील उदरनिर्वाह कसा करायचा यामुळे शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे नागरिकांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वारूंगसे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरी तालुक्यासह विविध भागात दसरा सण पारंपारिकरित्या मोठया उत्साहात साजरा :
इगतपुरी : विजय पगारे : सातव्या माळेचा मुहुर्त साधत घाटनदेवीच्या दर्शनासाठी उसळला जनसागर :
इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरीच्या विविध भागात विजेचा वारंवार लपंडाव : नागरिक हैराण : शेतकरी बेजार ! वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणे बिघडण्याची भीती : कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी :
इगतपुरी : विजय पगारे : ढोल ताशांचा गजरात ,सनईच्या निनादात,व वाजत गाजत आणि वरुणराजाच्या साक्षीने गणरायाचे इगतपुरी तालुक्यात आगमन : घोटीतही गणरायाचे उत्साहात स्वागत :
Marathi News Esakal
www.esakal.com