इगतपुरी- महाराष्ट्राची चेरापुंजी तथा पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी शहरासह तालुक्याच्या पश्चिम घाटपट्ट्यासह इगतपुरी शहर आणि कसारा घाट परिसरात रविवारी रात्रीपासून मुसळधार व संततधार पाऊस झाला असून, गेल्या २४ तासांत तब्बल १०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.