नाशिक- आडवण (ता. इगतपुरी) येथे औद्योगिक वसाहतीकरिता भूसंपादनासाठी संयुक्त मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत ‘एमआयडीसी’ला आवश्यक क्षेत्रासह नुकसानभरपाई बद्दलची भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लागून राहिले आहे.