Little Blossom School Nashik accident case
esakal
इगतपुरी शहर (नाशिक) : शहरातील लिटल ब्लॉसम शाळेच्या आवारात पहिल्या इयत्तेतील विद्यार्थ्यावर शाळेतील शिक्षकानेच कार घातल्याची धक्कादायक घटना (Igatpuri School Accident) समोर आली. बुटाची लेस बांधत असलेल्या या विद्यार्थ्याच्या अंगावरून कार गेल्याने तो गंभीर जखमी झाला. सुदैवाने विद्यार्थ्याचे प्राण थोडक्यात बचावले. या प्रकरणी चालक शिक्षकासह शाळेतील चार जणांविरुद्ध पोलिसांत बुधवारी (ता. २५) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.