
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाअखेरीस नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर यांच्यासह अनेक सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १४) जुन्या शिवसैनिकांचा एक गट शिंदे गटात सहभागी झाला.
श्री. गांगड, श्री. भोर तसेच माजी नगरसेवक मामा ठाकरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संपत काळे आदींसह अनेक जुन्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. (igatpuri taluka 15 sarpanch Old Shiv Sainik with former MLA join in Shinde group Nashik Latest Political News)
यापूर्वीच माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. श्री. गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बुधवारी पंचवटी विधानसभेचे माजी संपर्कप्रमुख दिलीप मोरे, शाखाप्रमुख अजित पवार, माजी उपशहरप्रमुख प्रकाश पवार, माजी शाखाप्रमुख सचिन थेटे, माजी उपविभागप्रमुख प्रमोद घोलप, अनिल पगारे, जिल्हा परिषद कर्मचारी बँकेचे माजी अध्यक्ष विक्रम पिंगळे, देवळा शिवसेनेचे शहरप्रमुख देवा चव्हाण, शिवसेनेचे देवळा तालुका संघटक भाऊसाहेब चव्हाण, देवळा उपशहरप्रमुख सतीश आहेर, देवळा शहर संघटक नाजिम तांबोळी, देवळा उपशहरप्रमुख भाऊसाहेब आहेर, शिवसेना महिला आघाडीच्या कीर्ती निरगुडे, करुणा धामणे, राधिका मराठे, राष्ट्रवादीच्या कोमल साळवे, अलका नाडेकर, रेखाताई तपासे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील सुमारे १५ सरपंचांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. जिल्हा संपर्कप्रमुख संजय बच्छाव, भाऊलाल तांबडे, लक्ष्मीबाई ताठे, सुजित जिरापुरे आदी उपस्थित होते. प्रवेश केलेल्या सर्वांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.