इगतपुरी : विजय पगारे Exclusive : इगतपुरी तालुक्यात धरणे,नदीपात्रे,साठवण तलाव आणि बंधाऱ्यांतील पाण्याची चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांचे आदेश : जलसाठ्यांतील अवैध पाणी उपशावर प्रशासनाची करडी नजर :

इगतपुरी : विजय पगारे Exclusive : इगतपुरी तालुक्यात धरणे,नदीपात्रे,साठवण तलाव आणि बंधाऱ्यांतील पाण्याची चोरी रोखण्यासाठी तहसीलदारांचे आदेश : जलसाठ्यांतील अवैध पाणी उपशावर प्रशासनाची करडी नजर :
Published on: 
पान दोन मेन ----------------- ०८८७५ भावली धरण ( ता.इगतपुरी ) : धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठी. ------------ जलसाठ्यांतील अवैध पाणी उपशावर प्रशासनाची नजर संयुक्त भरारी पथक स्थापन; अनधिकृत वीजजोडणी खंडित करण्याचे तहसीलदारांचे आदेश सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. ३१ : तालुक्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणे, नदीपात्रे, कालवे आणि बंधाऱ्यांमधील पाण्याचा अवैध उपसा व चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. जलसाठ्यांवर नियमित गस्त, अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तालुकास्तरीय ''संयुक्त भरारी पथका''ची स्थापना करण्यात आली आहे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अभिजित बारवकर यांनी हे आदेश दिले./ शासनाच्या निर्देशानुसार, इगतपुरी तालुक्यातील धरणांमधील उपलब्ध पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, काही भागांत शेती व व्यावसायिक वापरासाठी बेकायदेशीरपणे पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संयुक्त भरारी पथकात महसूल, ग्रामपंचायत, जलसंपदा, महावितरण आणि पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित मंडळ अधिकारी व ग्राममहसूल अधिकारी हे या पथकाचे समन्वयक म्हणून पंचनाम्याची जबाबदारी पार पाडतील.पथकाकडून जलस्रोतांची नियमित पाहणी केली जाईल. यात पाणी उपशासाठी अनधिकृत वीजजोडणी आढळल्यास महावितरणकडून तात्काळ वीजपुरवठा खंडित केला जाईल. तसेच पंप, पाइपलाइन व यंत्रसामग्री जप्त केली जाईल. ग्रामपंचायतीमार्फत दवंडी देऊन पाणी पिण्यासाठी आरक्षित असल्याचे जाहीर केले जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस बंदोबस्तात थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. ------------ शेतकरी अडचणीत इगतपुरी आदिवासी बहुल आणि धरणांचा तालुका असला, तरी येथील बहुतांश शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. आधीच दुष्काळामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा बंद किंवा नियंत्रित करण्याचे निर्णय घेतल्यास जगायचे कसे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेत शेतकरी व आदिवासी बांधवांच्या शेतीला व उपजीविकेला आधार द्यावा, अशी मागणी होत आहे. तालुक्यात आधीच दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, शासनाने शेतकरी हित जपावे. - ज्ञानेश्वर लहाने, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, घोटी इगतपुरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, याच तालुक्यातील शेतकरी संकटात आहे. शासनाचे निर्णय सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवणारे ठरत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. प्रशासनाने तातडीने रेशनचा प्रश्न सोडवून पात्र लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा सुरू करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. -निवृत्ती जाधव, जिल्हाप्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

इगतपुरी : विजय पगारे  : इगतपुरी तालुक्यातील बंद केलेले रेशनकार्ड पुर्ववत करा : ऐन सणासुदीच्या तोंडावर रेशनकार्ड रद्द झाल्याने नागरिक संतप्त : मनसेचे आत्मराम मते यांच्या शिष्टमंडळाचे तहसीलदारांना निवेदन :
इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरी येथील घाटनदेवी माता मंदिर भक्तनिवास लोकार्पण सोहळा उत्साहात : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन :
इगतपुरी : विजय पगारे : Exclusive : इगतपुरी तालुक्यात भातशेती करपल्याने बळीराजा हतबल : नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी : घनदाट वनक्षेत्रामुळे परिसरात वन्यजीवांचा वावर वाढला :
इगतपुरी : विजय पगारे : नवसाला पावणाऱ्या भवानी मातेच्या दर्शनासाठी आदीवासी भागातील मोडाळ्यात भाविकांची मांदीयाळी : ६० ते ७० हजार भाविकांची उपस्थिती :