इगतपुरी- दरवर्षी सऱ्हास पावसाने न्हालेल्या इगतपुरी तालुक्यात एप्रिल-मे महिन्यात रानमेव्यासाठी बाजारपेठ गजबजलेली असते. मात्र यंदा बाजारात रानमेव्याची चवच हरवली आहे. अक्षय तृतीयेसारख्या सणाच्या निमित्ताने रानमेव्याने भरलेली टोपली घेऊन येणाऱ्या ग्रामीण विक्रेत्यांची संख्या यंदा अत्यंत कमी झाली आहे.