नाशिक- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या बीबीए या दूरस्थ पदवी अभ्यासक्रमांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ‘शिका व कमवा’ या योजनेंतर्गत शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय काम करत असताना विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार असून, यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.