Crime
sakal
नाशिक: काही महिन्यांपूर्वी शहरात बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आलेली असतानाच, पुन्हा एकदा नाशिकमध्ये बेकायदेशीर घुसखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पांडवलेणी परिसरातील कवडेकरवाडी येथे अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी महिलांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून भारताचे बनावट आधार व पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका स्थानिक एजंटलाही अटक करण्यात आली आहे.