धुळे एसपी आक्रमक

धुळे एसपी आक्रमक
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- फोटो क्रमांक ः 32364 धुळे : पोलिस अधीक्षक कार्यालयात अवैध व्यवसाय करणाऱ्यांना सक्त सूचना देताना पोलिस अधीक्षक विशाल आनंद. -- ‘एसपीं’कडून अवैध व्यावसायिकांना दम - दंडात्मक पवित्रा : दुष्काळामुळे सावकारांनाही कडक इशारा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : शहरातील मुख्य बाजारपेठेच्या आग्रा रोडवर सायंकाळी घडलेली गोळीबाराची घटना, अवैध व्यवसायांना आलेले पेव आणि कायद्याचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट चित्र समोर आल्यानंतर तीव्र टिकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी आता आक्रमक पवित्रा घेत शहराच्या कायदा व सुव्यवस्थेची सूत्रे घट्ट करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांना अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे सक्त आदेश बजावले आहेत. - पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत अधीक्षक आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी सट्टा, जुगार, क्लब चालविणारे तसेच अवैध सावकारी करणाऱ्या सुमारे ५० ते ६० जणांना थेट कार्यालयात बोलावून कडक समज दिली. यापुढे पोलिसांच्या नजरेआड छुप्या पद्धतीने कोणतेही अवैध व्यवसाय किंवा सावकारी चालल्यास कठोर कारवाईतून कायदेशीर बडगा उगारला जाईल, असा सज्जड दम त्यांनी दिला. - आता कडक वचक शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या पार्श्वभूमीवर अवैध सावकारांकडून शेतकरी, शेतमजूर आणि गरजू नागरिकांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. व्याजासाठी कुणीही तगादा लावल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. धुळ्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने उचललेल्या या कठोर पावलांमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. - नागरिकांना आवाहन परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय किंवा अवैध सावकारी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com