Accidental Vehicle
Accidental Vehicleesakal

Nashik News : अवैध गोवंश वाहतूक करणारा भरधाव पिकअप उलटला; मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

Published on

Nashik News : बागलाण तालुक्यातील राहुड गावानजीक असलेल्या बेहड, नामपूर रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव असणा-या अवैधरीत्या गोवंश वाहतूक करणा-या पिकअप वाहनाचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला.

अपघातानंतर संबंधित चालक अंधाराचा फायदा घेत फसार झाला असून जायखेडा पोलिसांनी तीन लाख अठरा हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन अनाधिकृत गोवंश जनावरांची वाहतूकीबाबत गुन्ह्याची नोंद केली. (Illegal cattle transporters high speed pickup overturned material in custody of police Nashik News)

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विटाई ते राहुड रस्त्यावर पिकअप वाहन क्र. एमएच ४१, जी २६२८ या वाहनातून पहाटेच्या सुमारास कत्तलीच्या इराद्याने अवैध गोवंश वाहतूक केली जात होती.

मात्र रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून संबंधित वाहनचालक अतिवेगाने वाहन नेत असतानाच राहुड गावानजीक उलटला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन सदर वाहनचालक पसार झाला होता.

याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यातील हवालदार नानाजी धोंडगे, हवालदार राजेंद्र सोनवणे व निकेश कोळी यांना गुप्त खबरीकडून माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत. वाहनात निर्दयीपणे बांधलेली गोवंश तरूणांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढून गोशाळेत रवानगी केली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Accidental Vehicle
BJP News : बावनकुळे यांच्या कौतुकाने शहराध्यक्ष निवडीत ट्विस्ट; भाजपा बूथ सशक्तीकरण आढावा बैठक

तसेच पोलिसांनी वाहनासह एकूण तीन लाख अठरा हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पोलिस शिपाई किशोर सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून प्राणी संरक्षण सुधारण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार नानाजी पाटील करीत आहेत.

 गस्त वाढविण्यात यावी

गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीतून छुप्या पध्दतीने अवैध वाळू वाहतूक, गोवंश वाहतूक तसेच लाकूड वाहतूक आदी सुरू असल्याची गुप्त चर्चा होत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडून रात्रीतून गस्त वाढवून अनाधिकृत वाहतूकीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोसम व काटवन परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

या वाहतूकीवर आशिर्वाद नेमका कुणाचा असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Accidental Vehicle
Nashik Crime News : ग्रामपंचायतीचा बनावट दाखला वापरला; संशयिताविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com