electricity law
sakal
नाशिक: अतिउच्चदाबाच्या वाहिनीखाली तसेच संरक्षित क्षेत्रात बांधकाम करणे बेकायदेशीर असतानाही शहरात १३२ किलोवॉट क्षमतेच्या अतिउच्चदाब वाहिनीला लागून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे, इमारतींची उंची वाढण्याचे प्रकार होत आहेत. महापारेषण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात अशी ८० धोकादायक ठिकाणे आढळून आली आहेत. वाढत्या अतिक्रमणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जीवितहानी होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कंपनीकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे.