नाशिक- वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावरील महाराष्ट्र मोटर्सच्या मागे नाल्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असलेला अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने कारवाई करीत एकाला अटक केली असून, लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.