नाशिक - त्र्यंबकरोडवर विदेशी मद्यसाठा जप्त

नाशिक -  त्र्यंबकरोडवर विदेशी मद्यसाठा जप्त
Published on: 
NSK26H33976 नाशिक ः त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात जप्त करण्यात आलेला विदेशी मद्यसाठा व संशयित चालक. समवेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक. ----------- २०-१ अंजनेरी शिवारामध्ये विदेशी मद्यसाठा जप्त नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर- नाशिक मार्गावर कारवाई करत तब्बल १२ लाख ८३ हजार ६०० रुपयांचा परराज्यातील अवैध मद्यसाठा आणि वाहन जप्त केले आहे. अंजनेरी शिवारामध्ये हा सापळा रचण्यात आला होता. एका वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. अंजनेरी शिवार, ब्रम्हाव्हॅली कॉलेजसमोर वाहन तपासणीदरम्यान एक संशयित पिकअपची (एमएच ०१ इइ ४४७०) तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला मोठा मद्यसाठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्येमालामधून दिव, दमण आणि दादरा व नगर हवेली तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यात निर्मित असलेले आणि केवळ परराज्यात विक्रीसाठी परवाना असलेले ४७ बॉक्स विदेशी मद्य हस्तगत करण्यात आले आहे. वाहनासह, एक मोबाईल संच आणि मद्यसाठा असा एकूण १२ लाख ८३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक विशाल अशोक अंभोरे (२६, रा. सिडको, नाशिक) यास अटक केली आहे. प्रभारी निरीक्षक किरण धिदंळे, दुय्यम निरीक्षक राहुल मोडक, सहायक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे, जवान विलास कुवर, राहुल पवार, दुर्गादास बावस्कर, रामकृष्ण झनकर आणि वाहनचालक गोकुळ शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.