धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
सावकारी विळख्यातून शेतकऱ्यांच्या जमिनी मुक्त
-
उपनिबंधक मनोज चौधरी : धुळे जिल्ह्यात चार गुन्हे; २४ प्रकरणांत चौकशी सुरू
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : अवैध सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी व मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून चार तक्रारदार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी व मालमत्ता परत मिळाल्या आहेत. अवैध सावकारीविरुद्ध पुराव्यानिशी तक्रार केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी दिला आहे.
जिल्ह्यात अवैध सावकारीच्या तक्रारींच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय प्रशासकीय समिती कार्यरत आहे. यात जिल्हा पोलिस अधीक्षक हे समितीचे सदस्य, तर सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक हे सदस्य सचिव आहेत. या समितीची नियमानुसार दर तीन महिन्यांनी बैठक होते. त्यानुसार १४ जुलै २०२५, २६ फेब्रुवारी २०२६ व २४ जुलै २०२६ ला समितीच्या तीन बैठका पार पडल्या आहेत.
-
७७ तक्रारी प्राप्त
महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ मधील कलम १६ अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडे एकूण ७७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पैकी कसून चौकशी केल्यानंतर ५४ तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही, तर २४ प्रकरणांत अवैध सावकारीचा संशय असल्याने सध्या सखोल चौकशी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत चार दोषी सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याचा थेट फायदा म्हणून चार तक्रारदार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी व अन्य मालमत्ता कायदेशीर मार्गाने परत मिळाल्या आहेत.
-
१९ परवानाधारक
जिल्ह्यातील चार तालुक्यांत २०२५- २०२६ मध्ये एकूण १९ परवानाधारक सावकार कार्यरत होते. त्यांच्या माध्यमातून धुळे तालुक्यात ५५०, तर साक्री तालुक्यात ४७ कर्जदारांना कर्ज वाटप करण्यात आले होते. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धुळे जिल्हा दौऱ्यादरम्यान एका शेतकऱ्याने अवैध सावकारीसंदर्भातील आपली गंभीर समस्या थेट मांडली होती. त्यानंतर प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध सावकारीविरुद्ध तीव्र केलेल्या मोहिमेची माहिती उपनिबंधक चौधरी यांनी दिली.
-
१४-१
...चौकट...
१४-१
फोटो क्रमांक ः 31652...मनोज चौधरी
१४-१
अवैध सावकारीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता उपलब्ध कागदपत्रे व अन्य पुराव्यांसह निर्भीडपणे पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनामार्फत आहे.
- मनोज चौधरी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी विभाग, धुळे जिल्हा