नाशिक रोड- नाशिक रोड, जेल रोड, देवळालीगाव, विहीतगाव परिसराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. त्यासोबत अनेक समस्या उद्भवत आहेत. मॉल, दुकाने, सराफ दुकाने, हॉटेल, बॅंका, भाजी बाजार, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी जाणारे ग्राहक आपली वाहने दुकानांसमोरच उभी करतात. त्यात दुकानदारांची वाहने आणि साहित्यांची त्यात भर पडते. त्यामुळे शहरात येणारे इतर वाहनचालक मुख्य रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा नागरिकांना दररोज सामना करावा लागत आहे.