बेकायदेशीर वाळू वाहतूक

बेकायदेशीर वाळू वाहतूक
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी --- तामसवाडीच्या शिवारातून बेकायदेशीर वाळू वाहतूक तीन लाखांच्या ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ ः तामसवाडी (ता. धुळे) शिवारामध्ये विनापरवाना व बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तीन लाख रुपयांचे ट्रॅक्टर आणि पाच हजार रुपयांची वाळू, असा एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी चालक-मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी अनिल जंघाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १३ नोव्हेंबरला सकाळी तामसवाडी शिवारामध्ये ही कारवाई करण्यात आली. रमेश दत्तात्रय नांद्रे (रा. मोहाडी, ता. धुळे) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (एमएच १८, सीई ८२८५) व निळ्या रंगाच्या ट्रॉलीमध्ये शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता आणि विनापरवाना वाळूची वाहतूक करताना मिळून आला. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी जंघाळे यांच्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टरचालक रमेश नांद्रे याच्याविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाने केलेल्या या कठोर कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.