चोरीच्या दुचाकी निम्म्या-अर्ध्या किमतीत विकायच्या, अशी दुचाकी चोरट्यांची साधी अन् सोपी पद्धत. जोपर्यंत चोरटा पोलिसांच्या हाती लागत नाही, तोपर्यत गुन्ह्यांची उकल होत नाही. पण, सोलापूरच्या एका गुन्ह्यात सराईत दुचाकी चोरट्या तत्कालीन गुन्हेशोध पथकातील सहाय्यक निरीक्षक राकेश हांडे यांच्या हाती लागला. माळकरी असलेले हांडे यांनी युक्ती वापरली अन् अवघ्या २४ तासांच्या आत तीन ट्रकभर चोरीच्या दुचाकी पोलिस ठाण्यासमोर लागल्या.