नाशिक- महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) अंतर्गत होमिओपॅथिक डॉक्टरांना नोंदणीची परवानगी देणाऱ्या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, असा इशारा देत इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेने मंगळवारी (ता. ८) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन सादर करीत विरोध दर्शविला.