नाशिक- येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याला देश-विदेशातून भाविक सहभागी होणार आहेत. अशात आलेल्या भाविकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभागाला वैद्यकीय सेवा पुरविताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे ‘आयएमए’ची भूमिका महत्त्वाची असेल, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.