Immunity Booster Fruits : वाढत्या उन्हामुळे फळे खरेदीकडे कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

immunity booster fruits

Immunity Booster Fruits : वाढत्या उन्हामुळे फळे खरेदीकडे कल

नरकोळ (जि. नाशिक) : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस काही प्रमाणात वाढत असून शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळे खाणे तितकेच महत्त्वाचे असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या फळांना मागणी आहे. (Immunity Booster Fruits Due to increasing summer tendency to buy fruits nashik news)

निसर्गाच्या सान्निध्यात फळे आणि भाजीपालाच्या रुपात जीवनसत्त्वाचा खजिनाच दिला आहे. वाढत्या उन्हामुळे शरीराला पाण्याची गरज भासते फळाच्या सेवनाने महत्त्वाचे घटकसह पाणीही शरीरात जाते.

त्यामुळे भर उन्हात थकवा नाहीसा होतो. सध्या बाजारात विक्रीसाठी फळांची रेलचेल असल्याने नागरिकांकडून खरेदीसाठी चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सफरचंद या फळांमध्ये सर्वात जास्त जीवनसत्त्वे असून पोटॅशियम भरपूर आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

बाजारात बोरे, चिकू, द्राक्ष, कलिंगड, खरबूज, पपई यांना मोठी मागणी आहे. शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी फळे मदत करतात, फळांमध्ये जीवनसत्त्वे, अॅंटी-ॲक्सिडेंट व खनिजे असतात.

वजन कमी होणे, त्वचेची चमक नैसर्गिक गोडवा फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. फळे कोलेस्टरॉलची पातळी कमी करतात. फळांमध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.