उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात ४० टक्के घट

उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात ४० टक्के घट
Published on: 
उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात ४० टक्के घट --------- दुष्काळामुळे लागवडीवर परिणाम; रब्बी हंगामाच्या पेरण्यासाठी संथ गतीने --------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१५ : दुष्काळामुळे रब्बी हंगामावर थेट परिणाम झाला असून उन्हाळ कांद्याच्या लागवडीत यंदा ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. उन्हाळ कांद्याचे उत्पन्न घटण्याचा अंदाज घेऊन लाल कांद्याला सध्या सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. भविष्यातही कांदा तेजीत राहण्याचा अंदाज वर्तविला जातो. ---------------- जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने तब्बल १३ तालुक्यांमधे दुष्काळ आहे. दीपावलीच्या सणावरही त्याचा प्रभाव दिसून आला. दीपावलीनंतर गहू, हरभरा, उन्हाळी मका पेरणीला सुरुवात होते. चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला व सिन्नर या भागात उन्हाळ कांद्याची लागवड सुरु होते. नोव्हेंबर उजाडला तरी जिल्ह्यात रब्बी पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहे. कृषी विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४ टक्केच पेरण्या झाल्याची चिंताजनक नोंद झाली आहे. चार तालुक्यांत तर अद्याप पेरणीचा साधा श्रीगणेशाही झालेला नाही. जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी एकूण १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी दीपावलीपूर्वी प्रत्यक्षात केवळ ४ हजार ६३१ हेक्टरवरच पेरण्या झाल्या. पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये रब्बी पेरण्यांची अजून सुरुवातही झालेली नाही. दुसरीकडे, दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक ५.६८ टक्के पेरण्या झाल्या असून इतर सर्व तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण पाच टक्क्यांच्या आतच मर्यादित आहे. प्रमुख पीक असलेल्या गव्हासाठी ६४ हजार २३३ हेक्टर क्षेत्र निश्चित असून आतापर्यंत फक्त १ हजार ६२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ३३ हजार ३५७ हेक्टरपैकी केवळ १ हजार ५७५ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. खरीप हंगामात फटका बसलेल्या मक्यासाठी ९ हजार २८४ हेक्टरचे उद्दिष्ट असताना १ हजार ८६ हेक्टरवरच लागवड झाली आहे. ज्वारीच्या ४ हजार २२० हेक्टरपैकी २५९.४० हेक्टरवर पेरणी झाली असून, इतर कडधान्यांची पेरणीही अत्यंत कमी आहे. कमी पावसामुळे विहिरी आणि धरणांमधील पाणीसाठा आटल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम कांदा लागवडीवरही झाला आहे. उन्हाळ कांद्याचे जिल्ह्यात २.२५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात साधारणतः ३५ टक्क्यांवर घट झाल्यामुळे लागवडही मंदावलेली दिसते. … १६-१ लाल कांद्याची आवक वाढणार दीपावलीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवार (ता.१६) पर्यंत सुटी देण्यात आली होती. या कालावधीत शेतकऱ्यांनी लाल कांदा शेतातून काढल्याने विक्रीसाठी सोमवारी गर्दी होण्याची शक्यता आहे. लाल कांद्याला सध्या सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आवक कमी झाल्यास त्यातही वाढ होऊ शकते. १६-१ तालुकानिहाय पेरण्या (टक्के) बागलाण : १.५३, चांदवड : २.१५, देवळा : २.६६, दिंडोरी :५.६८, इगतपुरी ०.४५, कळवण ०.७३, मालेगाव २.४४, नांदगाव १.८० , नाशिक २.८०, निफाड ३.८२, पेठ-०, सिन्नर -१०.६७, सुरगाणा-१.४२, त्र्यंबकेश्वर-०.०२, येवला -३.०२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.