परतीच्या पावसानेही फिरवली पाठ; रब्बी हंगामावर परिणाम

परतीच्या पावसानेही फिरवली पाठ; रब्बी हंगामावर परिणाम
Published on: 
परतीच्या पावसानेही फिरविली पाठ; रब्बीवर परिणाम (उपशीर्षक) जमिनीत ओलावा कमी, पेरण्यांना अडथळा; उत्पादनात होण्याची शक्यता सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ३० : यंदा खरीप हंगामात पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पावसातील खंडामुळे काही भागांत पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी उत्पादनावर परिणाम झाला. आता परतीच्या पावसाकडून अपेक्षा असतानाही त्याने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम जेमतेम आहे. परतीचा पाऊस तरी दमदार होईल, अशी अपेक्षा असताना सप्टेंबरनंतर ऑक्‍टोबर देखील कोरडा गेला आहे. गतवर्षी ३ लाख ६९ हजार क्षेत्रावर रब्‍बीचा खरीप पेरा झाला होता. यंदा मात्र हाच रब्‍बीचा पेरा १ लाख ५० हजार क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या दुष्काळाचा जबर फटका बसणार आहे. पेरण्यांना अडथळा रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू आणि इतर पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. मात्र, पावसाचा खंड आणि कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पेरणी केल्यानंतर बियाण्यांची उगवण आणि पुढील वाढ कशी होईल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कोरडवाहू क्षेत्राला फटका जिल्ह्यातील कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. अशा क्षेत्रात परतीच्या पावसावर रब्‍बी हंगामाचे गणित अवलंबून असते. मात्र, यंदा परतीच्या पावसानेही निराशा केल्याने या भागातील शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगाम घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. तर दुष्‍काळी परिस्थिती असल्‍याने शेतीसाठी धरणातून आवर्तन सोडणे देखील शक्‍य नाही. परिणामी, काही शेतकऱ्यांना रब्बीचे क्षेत्र कमी करावे लागू शकते. इन्‍फो रब्बीचे क्षेत्र कमालीचे घटणार गेल्या वर्षी २ लाख ८० हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र होते. पण दमदार पावसामुळे तब्बल तब्बल १ लाख हेक्टरने पेरा वाढून जिल्ह्यात ३ लाख ७० हजार हेक्टरवर झाला होता. यंदा हेच क्षेत्र १ लाख ४० हजार ते १ लाख ५० हजारावर येणार आहे. प्रामुख्‍याने गहुचे क्षेत्र ५० हजार हेक्टरने घटणार जिल्‍ह्यात गेल्या वर्षी ७१ हजार पेक्षा अधिक गहुचे क्षेत्र होते. पण या वर्षी सिंचनाची व्यवस्था नसल्याने व आवर्तनाची आशा नसल्याने हे क्षेत्र २० हजार हेक्टरवर येणार आहे. तर मका क्षेत्र गेल्या वर्षी १ लाख ३० हजार हेक्टरवर होते. यंदा मात्र ३० हजारपर्यंत हे क्षेत्र राहील असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.