टुडे ३ : ॲंकर
(वैद्यकीय स्केच वापरावे)
--
लोगो : जागतिक भूलशास्त्र दिवस
----
रोबोटिक सर्जरीच्या दुनियेतही भूलशास्त्राचे महत्त्व अबाधित
उपशीर्षक
वेदनाविरहित शस्त्रक्रियेसाठी वरदान; भूलतज्ज्ञांच्या योगदानाला महत्त्व
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : वेदना विरहित शस्त्रक्रियांसाठी भूलशास्त्र हे वैद्यकीय क्षेत्रात सर्वांत महत्त्वाचे मानले जाणारे शास्त्र आहे. अलिकडच्या काळात तंत्रज्ञानातील बदलांमुळे आता थेट रोबोटिक सर्जरी शक्य झाली असली तरी, भूलशिवाय रोबोटिक सर्जरीही होत नाही. म्हणूनच आजच्या भूलशास्त्र दिनाच्या औचित्याने भूलतज्ज्ञांच्या या क्षेत्रातील योगदानाला दुर्लक्षित करता येत नाही.
कोणतीही शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय प्रक्रिया वेदना रहित सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी वापरलेले जाणारे शास्त्र म्हणजेच भुल शास्त्र. भूलतज्ञ शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची तपासणी करून सर्व माहिती विचारतात. रुग्णाचा पूर्वीचा वैद्यकीय इतिहास, चालू असलेले आजार, ऍलर्जी याबद्दल जाणून घेतल्यानंतरच भूल देण्याचा निर्णय घेतला जातो.
१४-१
अशी असते प्रक्रिया
शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे, किती वेळ चालणार आहे, या बाबींवरही कोणती भूल दिली जाणार हे अवलंबून असते. भूल दिल्यानंतर सुद्धा शस्त्रक्रिया चालू असताना रुग्णाची काळजी घेणे, रुग्णाच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनची पातळी याचे निरीक्षण सतत करावे लागते.
कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेप्रमाणे भूल देताना काही संभाव्य धोके असू शकतात आणि म्हणूनच भूल अधिक सुरक्षित राहणे यासाठी रुग्णांनी आपली संपूर्ण माहिती भुलतज्ज्ञाला देणे अति आवश्यक आहे.
शस्त्रक्रियेनंतर भूल उतरल्यावर सुद्धा पेशंटची काळजी घेणे आवश्यक असते आणि म्हणूनच भुलतज्ज्ञांना रुग्णांनी प्रश्न विचारून शंका निरसन करून घेणे खूप आवश्यक आहे.
---------
कोट..
आजच्या काळामध्ये आधुनिक भूलशास्त्र हे वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाचे क्षेत्र आहे. भुलतज्ज्ञ हा अतिदक्षता विभागात सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काम करतो. वेदनाविरहित प्रसूती प्रगत भुलतंत्रज्ञानामुळे गर्भवती महिलांची आवडती आणि प्रसिद्ध संकल्पना बनली आहे.
- डॉ. सोनाली महाजन
भूलतज्ज्ञ, जळगाव
-------------